Surviving the Pandemic

Worldwide, we are facing an unprecedented situation due to COVID19 pandemic. In India, young career aspirants are facing anxiety, fear & uncertainty about future plans. All important aspects of our daily lives like health, education, economy, personal finances, jobs are facing challenges which our last few generations have never faced in their lifetime.

After spending more than three decades in Healthcare Sector as a practicing physician and subsequently a long and exciting career in Business Management Education sector, I find this uncertainty as a major cause of panic than actual spread of Corona virus. To overcome this uncertainty and fear we all will have to develop self-resilience (ability to bounce back), which is a function of both body and mind.

The concept of self-resilience includes the following:

1. Analyze the external situation with open mind.
2. Create a self-portrait with the help of SWOT analysis (strengths, weaknesses, opportunities, threats)
3. Find out the best feasible & workable options in present situation.
4. Follow the best possible option with enthusiasm and hope

The world around us these days is filled with negativity. It is a challenge to stay positive. Online games and entertainment may distract our mind for some time, but they will not bring positivity in our life. The best way to bring positivity to our life is to explore ourselves and prepare for the opportunities ahead. Qualified and experienced mentors in the field of education will guide you on your career opportunities.

Work From Home is going to be the new normal for many months, or even years to come. This will require young professionals acquire new skills, especially related to technology. Additionally, domain knowledge, communication skills, conceptual skills, interpersonal skills, teamwork and emotional intelligence are going to be very important attributes of the new workforce. Many industrial functions like manufacturing, supply-chain management, marketing, finance and HR will now be performed as per the ‘new normal.’ New services will emerge and many old ways of working will quickly become outdated. Digital world will quickly overtake physical world. Working in this digital world will require new skills, new training, new attitude and new mindset.

Through this platform, we are trying to train the young minds for the challenges of the future. In the days to come, our qualified and experienced team will keep on posting write-ups on the various career options after graduation on this platform. Keep on reading these write-ups. I am sure they will help you clarify your minds and educate you on which career path to follow. Please feel to ask for clarification or more information on the contact addresses and numbers given along with the write ups.

Until then, stay healthy stay positive and stay safe!

Best wishes,
Dr. Atul Kapdi
9822323069
Academic Director, CDGIMS, Pune.

 

जागतिक महामारीला हरवताना

कोविड १९ या जागतिक महामारीने आज जगात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात तरुण विद्यार्थ्यांची मने अनिश्चितता, भीती आणि तणाव याने झाकोळून गेली आहेत. आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्थिती, नोकरी हे आपल्या जगण्याचे सगळे पैलू या महामारीने प्रभावित झाले आहेत. कित्येक पिढ्यांनी पाहिली नाही अशा अवस्थेतून आज जग जात आहे.

एक डॉक्टर म्हणून तीस वर्षांपेक्षा जास्त काळ काम केल्यानंतर आणि त्यानंतर गेली कित्येक वर्षे व्यवस्थापन क्षेत्रात अध्यापक आणि संचालक म्हणून काम करताना आज आपल्या आसपास समाजात जाणवणार्‍या भीतीचे खरे कारण करोना व्हायरसपेक्षा ही अनिश्चितता हेच आहे असे माझे मत झाले आहे. या अनिश्चिततेवर मात करायची असेल तर आपल्याला आपली तग धरून राहाण्याची क्षमता, आपला चिवटपणा वाढवला पाहिजे. संकटावर मात करून परत उसळी मारून वर येण्याची आपली शारिरीक आणि मानसिक क्षमता वाढवली पाहिजे.

हे कसे करता येईल? यासाठी आपल्याला खालील गोष्टी केल्या पाहिजेत:

  1. आपल्या आसपास घडत असलेल्या घटनांची खुल्या मनाने नोंद  घेणे व त्यांवर विचार करणे
  2. आपली स्वत:ची बलस्थाने, आपल्या व्यक्तिमत्वातले  कमकुवत दुवे, आपल्याला उपलब्द्ध असलेल्या संधी आणि आपणावर असलेली जोखीम यांचा वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून अभ्यास करणे
  3. या परिस्थितीत आपल्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे याचा विचार करून त्या मार्गाचा आशावादी दृष्टीकोनातून उत्साहाने अवलंब करणे

आज आपल्या आजूबाजूला जेथे बघाल तेथे नकारात्मकता आहे. सकारात्मक, आशावादी राहाणे हे मोठे आव्हान आहे. ऑनलाइन गेम्स खेळणे  किंवा वेबसिरीज बघणे याने तुमचे मन काही काळ दुसरीकडे रमेल, पण याने तुमच्या मनात सकारात्मकता येणार नाही.  तुम्हाला जर सकारात्मक व्हायचे असेल तर तुमच्या अंतर्मनात डोकावून पाहा आणि पुढे तुमच्यासाठी कोणत्या संधी उपलब्द्ध होणार आहेत याचा विचार करून तयारीला लागा. शैक्षणिक क्षेत्रातले अनुभवी आणि तज्ज्ञ लोक तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत.

येते काही महिने, कदाचित काही वर्षेसुद्धा, घरून काम करणे ‘वर्क फ्रॉम होम’ हा आपल्या जीवनशैलीचाच एक भाग होऊन जाईल. हे जर आपल्याला जमायचे असेल तर आपल्याला काही नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतील. यात तांत्रिक कौशल्ये तर आहेतच, पण याशिवाय तुमच्या विषयातील अद्यावत ज्ञान असणे, संभाषण साधण्याची कला अवगत असणे, नवीन कल्पना, नवीन विचार करणण्याची सर्जनशीलता असणे,   एकत्र काम करण्याची क्षमता असणे आणि भावनिक दृष्ट्या सक्षम असणे अशा अनेक गोष्टीही समाविष्ट आहेत.  उद्योगधंद्यांचे स्वरूप आता बदलणार आहे. उत्पादन,कच्च्या मालाचा पुरवठा आणि उत्पादित झालेल्या मालाचे वितरण,  मार्केटिंग, फायनान्स, हयूमन रिसोर्स मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टीही आता पूर्वीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केल्या जातील. जुने काही व्यवसाय बंद पडतील आणि नवे व्यवसाय, नवी उत्पादने, नव्या सेवा अस्तित्वात येतील. इंटरनेटला अभूतपूर्व महत्त्व येणार आहे, किंबहुना आलेच आहे. या डिजिटल जगात यशस्वी व्हायचे असेल तर नव्या कौशल्यांबरोबरच आपल्या नवे प्रशिक्षण घ्यावे लागेल, नवी वृत्ती अंगीकारावी लागेल, नवा दृष्टीकोन स्वीकारावा लागेल.

विद्यार्थ्यांना या नव्या जगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या मंचावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी एक लेखमाला सुरू करत आहोत. आमचे शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ व अनुभवी अध्यापक तुम्हाला मार्गदर्शन करणारे लेख प्रसिद्ध करतील. ते लेख काळजीपूर्वक वाचा.  आपण पुढचे शिक्षण कोणत्या क्षेत्रात घ्यायचे याबद्दल निर्णय घेण्यासाठी आणि तुमच्या मनातल्या शंका दूर होण्यासाठी  या लेखांचा खूप उपयोग होईल अशी मला खात्री वाटते. तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर या लेखांसोबत दिलेल्या पत्त्यांवर आणि क्रमांकांवर नि:संकोचपणे संपर्क साधा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला आनंदच होईल.

निरोगी राहा, सकारात्मक राहा, सुरक्षित राहा!

अनेकानेक शुभेच्छा.

डॉ. अतुल कापडी
अकडेमिक डायरेक्टर
चेतन दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
पुणे