Hello friends. I , Devyani Kulkarni, Librarian of CDGIMS, hope that you are keeping well and taking care of yourself. Stay indoors, stay healthy and stay positive.
Have you heard of the term ‘Digital Detox’? Digital detox refers to a period of time when a person avoids the use of devices such as smartphones, televisions, computers, tablets, etc. Digital detox means to spend some time without any digital screen in front of your eyes.
Digital Detox is considered very important for our physical and mental health especially when we are locked down because of Covid 19. You are surrounded with screens and notifications all day and night. Suppose you spend an hour per night watching your favourite show. That means you spend 7 hours per week in front of your laptop or TV (when you have already spent 8 hours at your computer for work). What if you spend that time for work out, for a walk, to talk with your loved one or to read a book? Doing a digital detox every now and then will have some great benefits on your wellbeing.
As a librarian, I think that reading is best option for digital detox. Physical reading of a book is more enriching, at least to some people. Have you noticed that reading a book feels more satisfying than reading on a tablet? Overall, electronic gadgets create more distractions. Physically reading a book offers fewer distractions. Research also suggests that when we read our mind processes abstract information more effectively.
It is never too late to start reading; so if you are a person who is not fond of reading, you can start today. Reading offers many benefits to the body and mind. Reading can protect you from Alzheimer’s disease. You know about Alzheimer Disease, right? Alzheimer’s is a type of dementia that causes problems with memory, thinking, and behaviour.
Regular reading helps you to become smart. It increases your brainpower in different ways. First, it makes you aware about the things happening around you. Whether it is politics, economics, social issues, technological developments or something else, reading makes you updated on these issues Reading also offers other benefits like, improving vocabulary, reducing stress, increasing creativity and imagination, offering mental peace and most importantly, encouraging positive thinking. we are all under tremendous stress due to the ongoing Covid 19 pandemic. Reading is the best stress buster. When you make reading as a habit, you will realize that you are able to analyse and understand things better. You also start to understand yourself and others better. This helps in improving your own performance and thought process. In a way, it enhances self-development skills that leads to a better career.
If you have never read anything other than textbooks before, you may start with small and interesting storybooks. If you have read something, you should take it to the next level. If you have read enough in one language, try reading in some other language. The joy of reading is endless.
So, step away from your computer, put away your mobile phone, switch off your TV, turn to a book, and enjoy the ride of reading which takes you everywhere.
Happy Reading!
Ms. Devayani Kulkarni
9552510996
वाचू आनंदे -भाग १
नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी डिजिटल डिटॉक्स या संकल्पनेबद्दल ऐकले आहे का? नाही ? तर मग चला, आपण ह्या संकल्पनेबद्दल जाणून घेऊयात. एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की भारतातील नागरिक वर्षातील ७५ दिवस आणि तरुणाई दिवसातील ४-७ तास केवळ स्मार्ट फोन वापरण्यात घालवतात. ह्या अतिरेकी वापरामुळे कुटुंबात विसंवाद, नात्यांतील दुरावा, एकाकीपणा, नैराश्य आणि त्यातून उद्भवणाऱ्या आत्महत्या ह्या सारखे असंख्य प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्याकरिता मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी डिजिटल डिटॉक्स किंवा नो स्क्रीन डे सारखे उपाय करणे गरजेचे आहे. डिटेल डिटॉक्स म्हणजे काही ठराविक वेळ कुठल्याही स्क्रीन किंवा इंटरनेट पासून पूर्ण दूर राहणे .
जरा विचार करा, आपण सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत आपला किती वेळ मोबाइल, टीव्ही , लॅपटॉप किंवा टॅबलेट वर घालवतो? समजा आपण आपला आवडता कार्यक्रम पाहण्यात रोज तास एक तास घालवतो. याचा अर्थ असा की आपण दर आठवड्यात आपल्या लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर 7 तास खर्च करतो आणि त्याचवेळी आपण संगणकावर कामासाठी ८ तास स्क्रीन समोर घालवलेले असतात. जर आपण हा एक तास जो तुम्ही टीव्ही वरील किंवा मोबाइल फोन वरील कार्यक्रम पाहण्यात खर्च करता तो वेळ जर तुम्ही फिरायला जायला , व्यायाम करायला, आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलण्यासाठी किंवा एखादे पुस्तक वाचण्यासाठी घालवला तर? इंटरनेटचा वापर थांबवणं हे अशक्य आहे. पण आपण त्यातून ब्रेक मात्र नक्की घेऊ शकतो. यामुळे तुमची कल्पनाशक्ती विस्तारते आणि नवनवे विचार सुचण्यामुळे जगण्याची नवी दिशा मिळते.
एक ग्रंथपाल म्हणून मी तुम्हाला सांगेन, की तुमचे आवडते पुस्तक वाचणे हा डिजिटल डिटॉक्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. टॅबलेटवर वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तक वाचणे हे जास्त समाधानकारक आहे. इलेक्ट्रॉनिक गॅझेट वर वाचन करीत असताना आपण अधिक विचलित होतो . वाचनाचे खूप फायदे आहेत . उदाहरणार्थ वाचन आपल्याला अल्झायमर ह्या रोगापासून वाचवू शकते, आपल्याला अल्झायमर रोग म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे ना? अल्झायमर हा मेंदूशी निगडित आजार आहे,ज्यामुळे स्मरणशक्ती, विचार आणि वर्तनासह अनेक समस्या निर्माण होतात. नियमित वाचनामुळे हा आजार टाळता येतो किंवा किमान त्याची तीव्रता कमी करता येते.
नियमित वाचन आपल्याला स्मार्ट बनण्यास मदत करते, वाचन आपल्याला आपल्या आसपास घडत असलेल्या राजकारण, अर्थशास्त्र आणि सामाजिक, सांस्कृतिक इत्यादीगोष्टींविषयी आपल्याला जागरूक करते . वाचनामुळे आपला शब्दसंग्रह सुधारतो. आपल्यावरील मानसिक ताण तणाव कमी होतो. वाचनाने आपली सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढते. वाचनाने आपल्याला मानसिक शांतता लाभते आणि आपले विचार अधिक सकारात्मक होतात. सध्या सुरू असलेल्या कोविड १९ या रोगाच्या जागतिक प्रसारामुळे आपण सर्व जण प्रचंड तणावाखाली आहोत. या तणावापासून मुक्ती मिळवण्याचा वाचन हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपण वाचनाची सवय लावून घेतली की आपण आपल्या आसपासच्या गोष्टींचे अधिक चांगले आकलन करून घेऊ शकतो आणि आपल्याला त्या गोष्टींचे व्यवस्थित विश्लेषण करता येते. वाचनाने आपल्याला स्वत:चीच नव्याने ओळख होते. वाचनाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आपले उत्तम करीयर घडवण्यात वाचनाचा मोठा वाटा असतो. सर्व क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींना वाचनाची आवड आणि सवय असते.
आपण यापूर्वी पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य काही वाचले नसल्यास आपण लहान आणि सोप्या गोष्टीच्या पुस्तकांपासून सुरुवात करू शकता. जर आपण काही वाचले असेल तर आपण ते पुढच्या स्तरावर नेले पाहिजे. जर आपण एका भाषेत पुरेसे वाचले असेल तर, दुसर्या भाषेत वाचण्याचा प्रयत्न करा. वाचनाचा आनंद अंतहीन आहे
तर आपल्या संगणकापासून दूर जा, आपला मोबाइल फोन बाजूला ठेवा, आपला टीव्ही बंद करा, एखाद्या पुस्तकाकडे वळा आणि वाचनाचा आनंद घ्या.
वाचनासाठी शुभेच्छा!