“Always be yourself, express yourself, have faith in yourself, do not go out and look for a successful personality and duplicate it” a beautiful and true quote by Bruce Lee.
To be successful in your career or in your job then first you need to know who you are or identify what your personality is. Knowing yourself means what you love to do, what your values are, what you believe in and what your strengths are. However, personality should not be the only factor you consider when choosing a career.
Not everyone knows what he or she want to do in life. This confusion is because too many career options are available and required skill-set are not clearly defined. People get carried away while selecting career and that is where they make mistakes. It is generally observed that persons choose their career only because other people say it or because someone says that a particular profession/ stream has ‘scope’ and then they realize that they have made a wrong decision. For example, a person chooses marketing course having heard that it has a ‘scope’, but if that person’s personality is not conducive to marketing then that person will not be successful in marketing.
It is extremely important to ensure that your personality is compatible with your career choice. What makes someone who they are? Each person differs in personality; as some may be outgoing and energetic some may be reserved and introvert, some may be sensitive and some may be thick-skinned. Some people like to mingle with others, make new friends, chat with them, and establish new relationships, while some people like to be aloof, quiet and prefer to work alone. Some people are able to express their thoughts in the right words, in the right language, while others find it difficult to do so.
You may have heard the story of rabbit and tortoise, two different personality, different thinking. The rabbit inspite of being fast lost the race while the slow tortoise won it. Therefore, it is not possible to say that a certain personality is right and a certain one is wrong, it is the nature of the person. Your personality is not static, it changes along with your age and situtation. Learning about your personality allows you to think about your emotions, behaviors, and ways of thinking on a day-to-day basis.
Today’s world is one of competition. The one who wins this competition survives. Selecting a career best suited for your personality type can result in a pleasant outcome. Today many students prefer to select career in Business Management, but are confused in selecting the specialization like Marketing, Finance, etc. There are certain personality characteristics and traits that best align with certain paths. hence, discover your personality before you start your career.
Do not compare yourself to anyone. Remember, there is no one in the world who is just like you, and so you are special, unique.
In the next section, we will understand how to discover your personality.
Remember “Personality begins where comparison leaves off. Be unique. Be memorable. Be confident. Be proud” – Shannon L. Alder
Dr. Supriya Phadke
9049319467
आपले व्यक्तिमत्व आणि आपला व्यवसाय
‘नेहमी तुम्ही जसे आहात तसे राहा, स्वत:ला व्यक्त करायला शिका, स्वत:वर विश्वास ठेवा आणि यशस्वी लोकांची नक्कल करायला जाऊ नका’- ब्रूस ली
आपल्याला जर आपापल्या व्यवसायात, नोकरीत यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात आधी आपण कोण आहोत, आपले व्यक्तिमत्व कसे आहे, आपल्याला काय करायला मनापासून आवडते, आपली मूल्ये, आपल्या निष्ठा काय आहेत, आपले गुणदोष काय आहेत हे माहिती करून घेणे आवश्यक असते. बरेच लोक हा विचार न करता इतरांच्या सांगण्यावरून किंवा ऐकीव बातम्यांवरून आपल्या करीयरची निवड करतात आणि तेथेच त्यांची चूक होते. पदवी मिळाल्यानंतर फक्त इतर लोक म्हणतात म्हणून किंवा एखाद्या विषयाला ‘स्कोप’ आहे म्हणून विद्यार्थी त्या विषयाची निवड करतात आणि नंतर आपला निर्णय चुकला असे त्यांच्या लक्षात येते. ‘स्कोप’ हा एखाद्या विषयाला नसतो, तर तो त्या व्यक्तीला असतो. मार्केटिंगला ‘स्कोप’ आहे म्हणून मार्केटिंगच्या अभ्यासक्रमाला एखाद्या व्यक्तीने प्रवेश घेतला पण त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व मार्केटिंगला साजेसे नसेल तर ती व्यक्ती मार्केटिंगमध्ये यशस्वी होणार नाही. त्यामुळे आपल्या करीयरची निवड करताना आपण कसे आहोत, आपले व्यक्तिमत्व कसे आहे याचा शोध घेतला पाहिजे.
सगळ्या लोकांचे व्यक्तिमत्व एकसारखे नसते. काही लोकांना इतरांच्यात मिसळायला, नवीन मित्र जोडायला, त्यांच्याशी गप्पागोष्टी करायला, नवीन संबंध प्रस्थापित करायला आवडते, तर काही लोक अंतर्मुख स्वभावाचे, शांत आणि एकट्याने काम करायला आवडणारे असतात. काही लोकांना आपले विचार नेमक्या शब्दांत, नेमक्या भाषेत अचूकपणे मांडता येतात, तर काही लोकांना असे करणे जड जाते. काही लोकांना स्टेजवर उभे राहून एखादे भाषण करणे अवघड वाटत नाही, तर काही लोकांना नुसत्या या कल्पनेनेच घाम फुटतो. काही लोक उतावळ्या स्वभावाचे, सगळी कामे वेगाने करणारे असतात तर काही लोक मुळातच विचारपूर्वक, संथ गतीने काम करणारे असतात. यातले कोण अधिक यशस्वी होतील हे सांगणे कठीण आहे. ससा आणि कासवाची गोष्ट आपण ऐकली असेलच. त्यामुळे अमुक एक व्यक्तिमत्व बरोबर आणि अमुक एक चूक असे सांगता येणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती.
आपापल्या नोकरीत, व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर आधी आपण कोण आणि कसे आहोत हे जाणून घ्या. आपले व्यक्तिमत्व हे स्थिर, अचल असत नाही. वयानुसार, अनुभवानुसार आपल्या व्यक्तिमत्वात बदल होत असतो. पण आपल्या व्यक्तिमत्वातल्या काही मूलभूत गोष्टी, आपल्या व्यक्तिमत्वाचा गाभा बदलत नाही. आपले व्यक्तिमत्व आपल्या व्यवसायाशी सुसंगत असेल तर आपल्याला यशस्वी होणे मुळीच अवघड नाही.
आजचे जग हे स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत जो जिंकला, तो जगला. पण या स्पर्धेत आपले मैदान आपल्या कुवतीनुरूप, आपल्या क्षमतेनुरूप आहे की नाही हे बघीतल्याशिवाय या स्पर्धेत उतरू नका. पाण्यात सुळूसुळू पोहणारा मासा जमीनीवर आला की तडफडून मरतो आणि जमीनीवर वेगाने धावणारे हरीण खोल पाण्यात जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे आपल्या करीयरचा शोध घेण्याआधी स्वत:चा शोध घ्या. स्वत:ची कुणाशीही तुलना करू नका. एक लक्षात घ्या, या जगात अगदी तुमच्यासारखी एकही व्यक्ती नाही आणि म्हणून त्या न्यायाने तुम्ही खास, अद्वितीय आहात.
आपल्या व्यक्तिमत्वाचा शोध कसा घ्यायचा हे आपण पुढील भागात पाहू.
शुभेच्छा!