How to Enhance Your Employability

“New skill sets in new Normal” – was the line in the newspaper; and it gave birth to so many questions in Rohan’s mind. Rohan is graduate student. During this lockdown, he was very much worried about his future. After reading the newspaper, he was thinking about What exactly is employability? What will be those new skill sets after this pandemic? Whether the skill sets, which he already has will work? How to create employability in this new normal? How will I get job? And so on. When he was thinking on the same lines he met many people from industry, academics, experienced people and then he tried to correlate important aspects required to improve employability.

To enhance your skill sets and to make you attractive candidate for a job will require adopting small steps in life. What is employability? It refers to the attributes of a person that make that person able to gain and maintain employment. Employability therefore, is not just getting a job; it is about a broader set of skills and attributes that will enable graduates to be successful throughout their working life.

Education, training and practical applications can give you an edge in the job market. These skills may also position you for higher earning roles with greater growth potential. Each individual has unique set of characteristics of learning. Knowledge, attitude, ability and skills are the factors how well we succeed in our personal and professional life. These factors influence our employability.
Knowledge: Knowledge are the things you know. Knowledge is different from skills in that it consists of the facts, information, or theoretical understanding of subjects. By acquiring knowledge, your level of intelligence, wisdom and overall to understand social, economic and other various concepts improves. Building knowledge is a lifetime pursuit. Knowledge consists of everything you have managed to absorb from school, friends, and your environment.

  • Attitude: an important factor to consider when thinking about your attitude is that it is not necessarily about having ‘good’ or ‘bad’ attitude, but how your awareness of your own outlook and state-of-mind on a given task influences your performance. Attitude is one of the most important factors of learning because while knowledge and skills go a long way, attitude is what keeps you going. Attitude can also determine your level of enthusiasm, which is another key factor in staying motivated to expand your knowledge, attitude, skills. Stay aware of your thoughts and mental attitude.
  • Ability: ability means physical or mental power to do or accomplish something. Ability is to acquire skills.
  • Skills: All types of communication play vital role in making you employable in industry. Verbal and written communications are very important. By giving presentations will improve your verbal and non-verbal communication and by requesting constructive feedback or criticism from trusted colleagues will help you out to go one-step ahead. Computer skills are crucial to get a job. Creativity and innovation has utmost important to survive in the competition. In addition keep yourself aware about current affairs or the things happening around you.
  • Advance your Education: Advance your education and improve your employability skills by getting a degree or certification. You can advance your education by participating in internships and work-study opportunities.
  • Self-Motivation: Whatever may happen aspirant employee has to keep himself self-motivated. Employees who are self-motivated and self-reliant are the assets for employers. One should move ahead with his/her personal and professional goals and objectives. The course of action to be made for achieving them.

Prof. Sushama Sathe
7722031960

 


नोकरी आणि व्यवसाय यांमध्ये यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे?

“नवीन कौशल्य –  नवीन संधी” – अशी वर्तमानपत्रातील ओळ होती; आणि यामुळे रोहनच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. रोहन पदवीधर विद्यार्थी आहे. या लॉकडाऊन दरम्यान तो आपल्या भविष्याबद्दल खूपच काळजीत होता. वर्तमानपत्रातली ही ओळ वाचताना त्याच्या मनात नोकरी कशी मिळवावी, व्यवसायात यशस्वी कसे व्हावे, कोविड-१९ नंतर मला नोकरी मिळवण्यासाठी कोणकोणत्या नव्या गोष्टी शिकायला लागतील असे विचार येऊन गेले. नंतर रोहन व्यावसायिक,  शिक्षणतज्ज्ञ अशा बर्‍याच अनुभवी लोकांना भेटला आणि मग त्याने आपल्याला चांगली नोकरी कशी मिळेल किंवा आपण एखादा व्यवसाय सुरू केला तर तो यशस्वी कसा होईल यावर बराच विचार केला. रोहनसारख्या विद्यार्थ्यांना मी खालील गोष्टी सांगू इच्छिते.

नोकरी मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे? चांगली नोकरी कुणाला मिळू शकते? पहिली गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्हाला नोकरी करायची आहे त्या क्षेत्रातले तुमचे ज्ञान अद्यावत असले पाहिजे. समजा तुम्हाला मार्केटिंगमध्ये करीयर करायचे आहे, तर मार्केटिंगमध्ये सध्या काय चालू आहे. कोणत्या कंपनीने मार्केटिंगसाठी कोणती युक्ती वापरली आहे, मार्केटिंगमध्ये कोण यशस्वी झाले आहे, कोण अयशस्वी झाले आहे हे सगळे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी ज्या क्षेत्रात तुम्हाला करीयर करायचे आहे त्या क्षेत्रातला तुमचा अभ्यास सखोल असला पाहिजे. हा अभ्यास नुसता पुस्तकी असून उपयोगी नाही, तर रोजच्या आयुष्यात पुस्तकातल्या कल्पनांचा कसा वापर केला जातो हेही तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ज्ञान आत्मसात केल्याने आपली बुद्धिमत्ता, शहाणपणा आणि एकूणच सामाजिक, आर्थिक आणि इतर विविध संकल्पना समजून घेण्याची बौध्दिक पातळी सुधारते. ज्ञान समृद्ध करणे ही जीवनातील सततची प्रक्रिया आहे. ज्ञानामध्ये आपण शाळा, मित्र आणि आपल्या समाजिक धार्मिक आणि राजकीय वातावरणातून समजून घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश होतो.

दुसरी गोष्ट म्हणजे कौशल्ये. कौशल्याचे बरेच प्रकार आहेत. टेक्निकल म्हणजे तांत्रिक कौशल्यांमध्ये कम्युटर आणि इंटरनेटशी संबंधित कौशल्यांचा समावेश होतो. आज कोणत्याही प्रकारची नोकरी हवी असेल तर तुम्हाला कम्प्युटर प्रभावीपणे वापरता आला पाहिजे. दुसरे कौशल्य म्हणजे संभाषणाचे. तुम्हाला किमान आपली मातृभाषा आणि इंग्रजीतून लोकांशी संवाद साधता आला पाहिजे. चांगले बोलता आणि लिहिता आले पाहिजे. आपणास उद्योगात रोजगार मिळवून देण्यात सर्व प्रकारचे संवाद व लेखन कौशल्य महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. तोंडी आणि लिखित स्वरुपात दुसर्‍याशी संवाद साधणे फार महत्वाचे आहेत आजच्या जगात सादरीकरण हेही कौशल्य अंगीकारणे आवश्यक आहे. हे कौशल्य सुधारण्यासाठी आपले मित्र, मैत्रिणी, सहकारी आपल्यास मदत करु शकतात. नोकरी मिळविण्यासाठी संगणक कौशल्य महत्त्वपूर्ण आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त चालू घडामोडी किंवा आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल स्वत: ला सतत जागरूक ठेवणे गरजेचे आहे.

पुढची गोष्ट म्हणजे वृत्ती किंवा दृष्टीकोन. तुम्ही यश किंवा अपयश यांच्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघता, तुम्हाला तुमच्यातल्या त्रुटी किंवा तुमच्या चुका कोणी लक्षात आणून दिल्या तर त्या मोकळ्या मनाने स्वीकारण्याची तुमची वृत्ती आहे का, तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यात किती रस आहे अशा गोष्टींवर तुमची वृत्ती ठरत असते. वृत्ती आपल्या उत्साहाचा स्तर देखील निर्धारित करू शकते. सकारात्मक वृत्ती तुम्हाला उत्साही आणि आनंदी करते. प्रत्येकाच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात अपयशाचे, वैफल्याचे क्षण येत असतातच. तुमची सकारात्मक वृत्ती तुम्हाला या अपयशावर मात कशी करायची ते शिकवते.

नंतरची गोष्ट म्हणजे तुमची क्षमता. तुम्ही शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या किती तंदुरुस्त आहात यावर तुम्ही तुमच्या नोकरी-व्यवसायामध्ये किती यशस्वी होता ते अवलांबून आहे. तुम्ही न थकता अनेक तास काम करू शकता का, तुम्हाला कामाच्या तणावाखाली काम करता येते का, तुम्ही बहुतेक वेळा  उत्साही आणि आनंदी असता का अशा अनेक गोष्टींतून तुमची क्षमता लक्षात येते.

आणि शेवटची गोष्ट म्हणजे प्रेरणा. तुमच्यात यशस्वी होण्यासाठी लागणारी आंतरिक प्रेरणा किती आहे, तुम्ही अल्पसंतुष्ट आहात की तुम्हाला अधिकाधिक यशाची आस आहे या गोष्टींवर तुमचे यश अवलंबून असते. काही लोकांमध्ये ही प्रेरणा त्यांच्या स्वत:च्या मनातूनच येते, तर काही लोक इतरांकडून प्रेरणा घेतात.

आता वरील गोष्टी कशा आत्मसात करायच्या आणि त्यांमध्ये प्राविण्य कसे प्राप्त करायचे हे आपण पुढच्या लेखात पाहू.

सुषमा साठे